दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला अभिनेता संग्राम समेळ, जाणून घ्या त्याच्या पत्नीबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 18:10 IST2021-03-09T18:06:08+5:302021-03-09T18:10:14+5:30

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

Actor Sangram Samel get married shraddha phatak | दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला अभिनेता संग्राम समेळ, जाणून घ्या त्याच्या पत्नीबद्दल

दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला अभिनेता संग्राम समेळ, जाणून घ्या त्याच्या पत्नीबद्दल

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकताच अभिनेता संग्राम समेळ लग्नाच्याबेडीत अडकला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. इचलकरंजीला हा लग्न सोहळ पार पडला. दोघे वधू आणि वराच्या जोड्यात खूपच सुंदर दिसत होते. संग्रामची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. तिचे डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. संग्रामचे हे दुसरं लग्न आहे.  2016मध्ये संग्रामचं पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. 


मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटकापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली.स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. संग्रामला खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतून. या मालिकेतील समीर या व्यक्तीरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 'हे मन बावरे'मध्ये संग्राम दिसला होता.  संग्रामने मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅजुएशन केलं आहे. अभिनयाचे धडे त्याला घरातूनच मिळाले आहेत. 

Web Title: Actor Sangram Samel get married shraddha phatak