Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या' शोमधून या लोकप्रिय कलाकाराने घेतली एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 17:13 IST2023-03-03T16:56:53+5:302023-03-03T17:13:09+5:30

‘चला हवा येऊ द्या’ हा शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आता या शोमधून एका प्रसिद्ध कलाकाराने निरोप घेतला आहे.

Actor sagar karande took an exit from the show chala hawa yeu dya | Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या' शोमधून या लोकप्रिय कलाकाराने घेतली एक्झिट

Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या' शोमधून या लोकप्रिय कलाकाराने घेतली एक्झिट

नमस्कार मंडळी, हसताय ना... हसायलाच पाहिजे, असं म्हणत दीर्घकाळापासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा झी मराठीवरचा ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा प्रेक्षकांचा अतिशय लाडका कार्यक्रम.  सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) आणि श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. दरम्यान आता या लोकप्रिय शोमधून एका अभिनेत्याने निरोप घेतल्याचं समोर आलं आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजपर्यंत अनेक सेलिब्रिटी आले.अगदी मराठीसह बॉलिवूड, टॉलिवूडचे कलाकारही या मंचावर दिसले. या कलाकारांनाही या शोने खळखळून हसवलं. या शोमधून एका कलाकाराने आता निरोप घेतला आहे. 

'चला हवा येऊ द्या'मधून सागर कारंडेने एक्झिट घेतली आहे. यामागचं कारण अद्याप समोर आलेल नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले.

सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे की, प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टाल्जिक झाले. सागरने हा शो सोडल्यामुळे श्रेया बुगडे पत्रवाचन करताना दिसणार आहे. 

Web Title: Actor sagar karande took an exit from the show chala hawa yeu dya