‘नजर’मध्ये अभिनेत्री रितू शिवपुरी साकारणार विशेष भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 07:15 IST2019-04-30T07:15:00+5:302019-04-30T07:15:00+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेने आपल्या गुढ कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कथानकाला मिळणाऱ्या अनपेक्षित  नव्या वळणांमुळे ही मालिका लोकप्रिय ठरली आहे.

Actor Ritu Shivpuri will play a special role in 'Nazar' | ‘नजर’मध्ये अभिनेत्री रितू शिवपुरी साकारणार विशेष भूमिका 

‘नजर’मध्ये अभिनेत्री रितू शिवपुरी साकारणार विशेष भूमिका 

ठळक मुद्दे अभिनेत्री रितू शिवपुरीची एंट्री होणार आहे रितू यात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेने आपल्या गुढ कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कथानकाला मिळणाऱ्या अनपेक्षित  नव्या वळणांमुळे ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत अभिनेत्री रितू शिवपुरीची एंट्री होणार आहे. रितू यात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

रितू शिवपुरी म्हणाली, “अमानवी शक्तींच्या विषयावर आधारित असलेली ‘नजर’ ही माझी पहिलीच मालिका आहे. माझी व्यक्तिरेखा रहस्यमय आहे आणि ती प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवणारी आहे. यात मी कोहरा (धुकं) नावाच्या एका अमानवी शक्तीची भूमिका साकारणार आहे. कोहरा ही अंशची (हर्ष राजपूत) चुलत बहीण आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरू असताना कोहराच्या आगमनामुळे राठोड कुटुंबियांच्या जीवनात काही अनपेक्षित वळणं निर्माण होतील. मी यापूर्वी अमानवी शक्तीची भूमिका रंगविलेली नसल्यानं कोहराची व्यक्तिरेखा साकारण्यास मी खूपच उत्सुक बनले आहे. त्या व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्यं आणि वेगळेपण मला दाखवायचं आहे. मला या नव्या रूपात पाहताना माझ्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल, अशी आशा करते. यापुढेही प्रेक्षक आणि चाहते माझ्यावर पूर्वीसारखाच प्रेमाचा वर्षाव करतील, अशीही मला आशा आहे.”

‘आँखे’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती. ‘स्टार प्लस’वरील ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतही तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका याआधी रंगविली होती. 

Web Title: Actor Ritu Shivpuri will play a special role in 'Nazar'