फॅननेच दिली होती अभिनेता प्रसाद जवादेला मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 13:00 IST2024-04-14T12:59:05+5:302024-04-14T13:00:04+5:30

अभिनेता प्रसाद जवादे कायम चर्चेत असतो.

actor Prasad Jawade threatened by fan | फॅननेच दिली होती अभिनेता प्रसाद जवादेला मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं ?

फॅननेच दिली होती अभिनेता प्रसाद जवादेला मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं ?

'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे कायम चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे.  तो प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे.  मात्र कलाकार म्हटलं की चाहत्यांचे अनेक बरेवाईट अनुभवही येतात. काही चाहते आपल्या लाडक्या कलाकारासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार होतात, मात्र काही चाहते त्यांची हद्द पार करताना दिसतात. असाच एक अनुभव प्रसाद जवादेला आला होता.  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं.

प्रसाद जवादेनं नुकतचं लोकमत फिल्मीशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. त्यावेळी प्रसादनं त्याला आलेला चाहत्याचा अनुभव सांगितला. हा अनुभव सांगताना प्रसाद म्हणाला, एक मुलगा गर्दीतून आला आणि माझ्यावर हात उचलत म्हणाला, 'ऐ दादा तु अभिजित आणि शमिकाला त्रास दिला तर एक फाईट मारेन'. त्याचे ते शब्द ऐकून मी थोडा दचकलोच'. यासोबत काही चाहते हे फोटो घेताना खाद्यांवर हात ठेवा असं म्हणत असल्याचंही प्रसादनं सांगितलं.   

प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो 'पारू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. प्रसादनं बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'असे हे कन्यादान', 'अरुंधती', 'कुलस्वामिनी'  अशा अनेक मालिकांमध्ये प्रसाद झळकला होता. 'असे हे कन्यादान' मालिकेत त्याने साकारलेली कार्तिक ही भूमिका चांगलीच गाजली होती.

Web Title: actor Prasad Jawade threatened by fan