'बिग बॉस मराठी ५'मध्ये लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 21:42 IST2024-07-28T21:42:11+5:302024-07-28T21:42:35+5:30

सुप्रसिद्ध अभिनेता पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळेची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री झालीय (bigg boss marathi 5)

actor Pandharinath kamble aka Paddy Kamble in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh colors marathi | 'बिग बॉस मराठी ५'मध्ये लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेची एन्ट्री

'बिग बॉस मराठी ५'मध्ये लोकप्रिय अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेची एन्ट्री

'बिग बॉस मराठी ५' मध्ये घरातील चौथ्या स्पर्धकाची एन्ट्री झालीय. हा स्पर्धक म्हणजे पंढरीनाथ कांबळे. पॅडी या टोपणनावाने पंढरीनाथ यांची मराठी मनोरंजन विश्वात यांची ओळख आहे. पंढरीनाथ कांबळे हे स्वतःचा आवाज मांडायला 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दाखल झाले आहेत. पंढरीनाथ यांना आपण गंगूबाई नॉनमॅट्रीक, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा लोकप्रिय मालिकांमध्ये पाहिलंय.

पॅडी कांबळेची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री

पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळेची 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दणक्यात एन्ट्री झालीय. आतापर्यंत लोकांना विदूषक म्हणून दिसणारा पॅडी 'बिग बॉस मराठी ५' मध्ये स्वतःचा आवाज मांडायला आलाय. पॅडीने रितेशला भाऊ म्हणणं पसंत केलंय. पॅडीने घरातील सर्वांचा विचार करुन आल्या आल्या १० हजारांची बीबी करन्सी स्वीकारली आहे.


आतापर्यंत या स्पर्धकाची घरात एन्ट्री

'बिग बॉस मराठी ५' मध्ये आतापर्यंत पंढरीनाथ कांबळे यांचा सहभाग मोजता चार स्पर्धकांची एन्ट्री झालीय. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता निखिल दामले, सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध अंकिता प्रभू वालावलकर आणि पॅडी कांबळे असे चार स्पर्धक 'बिग बॉस मराठी ५' मध्ये दाखल झाले आहेत. रितेश देशमुख हा सीझन होस्ट करतोय.

Web Title: actor Pandharinath kamble aka Paddy Kamble in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh colors marathi