'तो' परत आला! 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजने पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज; 'हास्यजत्रे'त करणार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:26 IST2025-10-13T13:22:56+5:302025-10-13T13:26:23+5:30
प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा बोनस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये लोकप्रिय विनोदवीराचं कमबॅक

'तो' परत आला! 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजने पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज; 'हास्यजत्रे'त करणार कमबॅक
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमासह केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे लाखों चाहते आहेत.या कॉमेडी शोने अनेक नवख्या कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे.हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवलं. दरम्यान, या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ओंकार भोजने आणि गौरव मोरे काही महिन्यांपूर्वी एक्झिट घेतली.त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले होते. अनेकजण आजही त्यांना मिस करतात. त्यात आता या लोकप्रिय असणार्या शोबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हास्यजत्रेच्या मंचावर हास्याचे फुलोरे उडवण्यासाठी तसेच रसिकांना खळखळून हसवायला हुरहुन्नरी कलाकार पुन्हा एकदा एन्ट्री घेणार आहे.
आपले अंतरंगी डायलॉग, हटके विनोदशैली आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता ओंकार भोजने लवकरच या शोमध्ये कमबॅक करणार असल्याची माहिती मिळते आहे. मुंबई टाइम्स च्या रिपोर्टनुसार, ओंकार भोजने याने हास्यजत्रेच्या शूटिंगला सुरुवात केली असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान, याबाबत ओंकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कोकण कोहिनूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकार भोजनेने त्याच्या प्रत्येक स्किटमधील पात्राला योग्य न्याय दिला. आता त्याच्या घरवापसीमुळे ऐन दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा बोनस मिळणार आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या येण्याने हास्यजत्रेत चार चॉंद लागणार एवढं मात्र नक्की!