'कुसुम' मालिकेत मुख्य भूमिकेतील हा अभिनेता ६ वर्षांपासून या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:00 IST2021-10-05T07:00:00+5:302021-10-05T07:00:00+5:30

कुसुम ही नवीन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

The actor in the lead role in 'Kusum' has been dating this famous actress for 6 years | 'कुसुम' मालिकेत मुख्य भूमिकेतील हा अभिनेता ६ वर्षांपासून या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

'कुसुम' मालिकेत मुख्य भूमिकेतील हा अभिनेता ६ वर्षांपासून या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

सोनी मराठी वाहिनीवर ४ ऑक्टोबरपासून कुसुम ही नवीन मालिका दाखल झाली आहे. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून त्याजागी म्हणजेच रात्री ८.३० वाजता कुसुम ही मालिका प्रसारित होत आहे. लागिर झालं जी मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत अभिनेता अजिंक्य ननावरे हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

सासरी राहून नोकरी आणि संसार सांभाळत असताना माहेरच्यांची देखील तितकीच जबाबदारी स्वीकारणारी आधुनिक विचारांची कुसुम या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शिवानी आणि अजिंक्यसोबत शिल्पा नवलकर, आरती मोरे, राहुल मेहेंदळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरे नुकताच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत आदित्य राजेशिर्केच्या भूमिकेत झळकला होता.

अजिंक्य ननावरे हा मूळचा साताऱ्याचा आहे. मुंबई युनिव्हर्सिटी मधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले असून त्याला अभिनयासोबतच फोटोग्राफीची देखील विशेष आवड आहे.

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून त्याने मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. सख्या रे, तू जीवाला गुंतवावे, गर्ल्स हॉस्टेल या मालिका आणि वाडा चिरेबंदी, हे मृत्युंजय या गाजलेल्या नाटकात त्याने महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. 


अजिंक्य गेल्या ६ वर्षांपासून बिग बॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेला डेट करत आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेने एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या निर्णयाबाबत त्यांनी घरच्यांना देखील सांगितले असून त्यांच्या लग्नाला घरच्यांकडून संमतीदेखील मिळाली. मात्र आताच लग्नबेडीत न अडकता आपल्या करिअरकडे लक्ष्य दया’ असा सल्ला देखील त्यांनी दिला.


शिवानी सुर्वेला देवयानी या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली होती. नव्या, फुलवा, अनामिका, जाना ना दिलं से दूर, ट्रिपल सीट अशा हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातून शिवानी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील ती सहभागी झाली होती. त्यावेळी ती चर्चेत आली होती.

Web Title: The actor in the lead role in 'Kusum' has been dating this famous actress for 6 years