'खरं सांगायचं तर तू हात दिलास म्हणून...'; अभिनेता कुशल बद्रिकेची पत्नी सुन्नैनासाठी लिहिलेली 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:05 IST2022-05-02T11:43:13+5:302022-05-02T12:05:59+5:30

कुशलने पत्नी सुन्नैनासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Actor Kushal Badrike write special post for his wife Sunnaina goes viral on internet | 'खरं सांगायचं तर तू हात दिलास म्हणून...'; अभिनेता कुशल बद्रिकेची पत्नी सुन्नैनासाठी लिहिलेली 'ती' पोस्ट व्हायरल

'खरं सांगायचं तर तू हात दिलास म्हणून...'; अभिनेता कुशल बद्रिकेची पत्नी सुन्नैनासाठी लिहिलेली 'ती' पोस्ट व्हायरल

'चला हवा येऊ द्या'मधून घराघरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रीकेचं... कधी मुलांसोबत स्वत अभ्यास करताना...तर कधी फॅमिली पिकनीक...कुशल शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढतोच आणि आनंदाने त्यांच्यासोबत कॉलिटी टाईम स्पेण्ड करतो...कुशलचं लव्ह मॅरेज असून त्याने 2009 मध्ये सुनैनाशीच लग्नगाठ बांधली. आज या दोघांना दोन गोड मुलं आहेत...प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते अगदी तसंच कुशलच्या मागेदेखील सुन्नैना कायम उभी राहिली. पण या सगळ्यात ती नं आपलं करिअर देखील सांभाळलं. सुन्नैना कथ्थक डान्सर आहे. अलीकडेच कुशल आणि सुन्नैनाच्या लग्नाचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त कुशलने पत्नी सुन्नैनासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

कुशलने लिहिले, मला पक्की खात्री आहे “सोळा सोमवारच्या” उपवासात तू नक्की काहीतरी cheating केली आहेस, नाहीतर माझ्याशी गाठ बांधून देव तुझ्या “वट”सावित्रीची पार “वाट” लावणार नाही ,😬😬पण खर सांगायच तर तू हात दिलास म्हणुन आजवरचा माझा प्रवास सुखाचा झाला,💝💝 thank you for being in my life, thank you for always supporting me, thank you for bearing me 🤭🤭 आणि 1 big thank you in advance उद्याच्या tour ची bag भरशीलच म्हणून 

कुशल आणि सुन्नैनामधलं स्पेशल बॉन्डिंग फोटोमध्ये दिसतं आहे. आज कुशल यशाच्या शिखरावर आहे. कारण कठीण काळातही सुन्नैना त्याच्यामागे ठामपणे उभी राहिली. . खरच हे दोघे एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत. कुशल हा सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतो. तो सुन्नैना सोबतचे अनेक खास क्षण हे कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

Web Title: Actor Kushal Badrike write special post for his wife Sunnaina goes viral on internet