रसिकांचा होणार हिरमोड, 'देवमाणूस 2 'मध्ये दिसणार नाही प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 14:46 IST2021-12-01T14:43:37+5:302021-12-01T14:46:11+5:30

Devmanus 2 मालिकेत नवीन कलाकार झळकणार की जुनेच कलाकार रसिकांच्या भेटीला येणार हे तर मालिका सुरु झाल्यावर स्पष्ट होईल.

Actor Kiran Dange will not be seen in Devmanus 2, fans will not be happy for sure, Check the Reason Behind | रसिकांचा होणार हिरमोड, 'देवमाणूस 2 'मध्ये दिसणार नाही प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या कारण

रसिकांचा होणार हिरमोड, 'देवमाणूस 2 'मध्ये दिसणार नाही प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या कारण

'देवमाणूस २' मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि रसित आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. ‘देवमाणूस’ ही मालिकेने टीआरपीत अव्वल असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका 'देवमाणूस २' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मालिकेचा दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी टीव्हीवर पाहिला आणि सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं होतं.हा नवीन सीजन लवकरचं सुरू होणार असून यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे याची उत्सुकता देखील रसिकांना आहे.किरण गायकवाडच नाहीतर इतर कलाकारांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या होत्या. त्यामुळे कथानकाप्रमाणे कलाकारही रसिकांचे आवडते बनले होते. मात्र आता मालिकेचा दुसरा भाग येताच चाहत्यांचा चांगलाच हिरमोड होणार असं दिसतंय. 

कारण मालिकेतल्या पहिल्या भागातले कलाकार दुसऱ्या भागात दिसणार की नाहीत याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. रसिकांचा आवडता अभिनेता किरण डांगे या मालिकेत दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. कारण किरण सध्या 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत झळकतोय. त्यामुळे आता किरण डांगे देवमाणूस २ मध्ये झळकणार की नाही यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता मालिकेत नवीन कलाकार झळकणार की जुनेच कलाकार रसिकांच्या भेटीला येणार हे तर मालिका सुरु झाल्यावर स्पष्ट होईल.

तुर्तास 'देवमाणूस २' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. मुळात देवमाणूस मालिकेच्याच जागी 'ती परत आलीये' मालिका सुरु करण्यात आली होती. 'ती परत आलीय' मालिकेतील गुढ रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरेल अशी टीमला अपेक्षा होती. मात्र या मालिकेला फार काही यश मिळाले नाही. अवघ्या काही महिन्यांतच मालिका आता एका विलक्षण वळणावर संपणार आहे. 'देवमाणूस २' ला कितपत पसंती मिळते हे पाहणेही रंजक असणार आहे.

Web Title: Actor Kiran Dange will not be seen in Devmanus 2, fans will not be happy for sure, Check the Reason Behind