'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 17:17 IST2023-08-14T17:16:35+5:302023-08-14T17:17:05+5:30

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलं आहे.

Actor Hardik Joshi's entry in the serial 'Tujhech Mi Geet Gaat Hai' will be seen in this role | 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिनेता हार्दिक जोशीची एण्ट्री, दिसणार या भूमिकेत

स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Geet Gaat Aahe) मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलं आहे. एकीकडे स्वराजच आपला मुलगा आहे हे सत्य मल्हारसमोर उलगडेल का याची उत्सुकता असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. शुभंकर ठाकूर असं या नव्या पात्राचं नाव असून त्याचं मोनिकासोबत खास नातं आहे. हे नातं नेमकं काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. मात्र शुभंकरच्या एण्ट्रीने मालिकेत धमाकेदार वळण येणार हे मात्र नक्की. अभिनेता हार्दिक जोशी शुभंकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या नव्या भूमिकेबद्दल सांगताना हार्दिक जोशी म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जुनं नातं आहे. लक्ष्य, पुढचं पाऊल आणि दुर्वा या मालिकांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या. जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करण्याचा योग जुळून आला आहे. एखादं नवं पात्र जेव्हा मालिकेत येतं तेव्हा ते नवी गोष्ट घेऊन येतं. ते पात्र ती गोष्ट रंगवत असतं. शुभंकरच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य रंगेल. परदेशात असलेला शुभंकर बिझनेसच्या निमित्ताने भारतात आला आहे. 

हार्दिक जोशी पुढे म्हणाला की, शुभंकर स्पष्टवक्ता असला तरी मनाने अतिशय हळवा आहे. त्याला इतरांनी केलेली मदत तो कधीच विसरत नाही. शुभंकरचं कामत कुटुंब आणि मोनिकासोबत नेमकं काय कनेक्शन आहे हे लवकरच उलगडेल. 

वर्कफ्रंट...
हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. शेवटचा तो सुंदरी मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने IAS अजिंक्यची भूमिका साकारली होती.

Web Title: Actor Hardik Joshi's entry in the serial 'Tujhech Mi Geet Gaat Hai' will be seen in this role