प्रेक्षकांना धक्का! 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, कोण साकारणार भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:58 IST2025-11-15T15:53:02+5:302025-11-15T15:58:18+5:30
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट, कारण अस्पष्ट

प्रेक्षकांना धक्का! 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, कोण साकारणार भूमिका?
Savlyachi Janu Savli Serial: छोट्या पडद्यावरील मालिकांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग बनला आहे.या मालिकांमधील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आपलंच कोणीतरी असल्यासारखं वाटतं. मालिकांमध्ये कलाकार जेव्हा एखादं पात्र सााकरतो तेव्हा त्या पात्राला एक वेगळी ओळख मिळते. अमुक एक पात्र म्हणजे एखादी व्यक्ती असं चित्र प्रेक्षकांच्या मनात स्पष्ट असतं.या कलाकारांना बहुधा प्रेक्षक हे त्यांच्या नावापेक्षा पात्रामुळे जास्त ओळखतात.अनेकदा कथानकानुसार कधी मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री केलीज जाते, तर कधी जुन्या पात्राची एक्झिट होते. अशीच माहिती समोर आली आहे. झी मराठी वाहिनीवरीव एका लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्याची एक्झिट झाली आहे.
या मालिकेचं नाव सावळ्याची जणू सावली आहे. मालिकेचं आगळं वेगळं कथानक आणि त्यातील नवनवीन ट्विस्ट यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री प्राप्ती रेडकर, साईंकित कामत,सुलेखा तळवलकर, वीणा जगताप अशी तगडी स्टारकास्ट मालिकेत आहे. याशिवाय मालिकेत सारंग म्हणजेत साईंकित कामतच्या भावाची भूमिका अभिनेता गुरु दिवेकरने साकारली होती. मात्र, काही कारणास्तव या अभिनेत्याने मालिका सोडली आहे. याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत.दरम्यान, गुरु दिवेकरच्या एक्झिटनंतर सोहम हे पात्र अभिनेता रुचिर गुरव साकारताना दिसणार आहे.
रुचिर गुरवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर याआधी त्याने 'स्वाभिमान', 'नवरी मिळे हिटलरला', 'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.