Sajid Khan Evicted: बिग बॉसच्या घरातील साजिद खानचा प्रवास संपणार?, होणार बेदखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 08:57 AM2022-12-17T08:57:31+5:302022-12-17T09:18:43+5:30

 ‘बिग बॉस 16’मध्ये या आठवड्यात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरात नुसते राडे पाहायला मिळाले

According to report sajid khan eliminated from bigg boss house | Sajid Khan Evicted: बिग बॉसच्या घरातील साजिद खानचा प्रवास संपणार?, होणार बेदखल

Sajid Khan Evicted: बिग बॉसच्या घरातील साजिद खानचा प्रवास संपणार?, होणार बेदखल

googlenewsNext

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : ‘बिग बॉस 16’मध्ये या आठवड्यात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. घरात नुसते राडे पाहायला मिळाले 'बिग बॉस 16' सीझनचा वीकेंड वार ही आला आहे. या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचं डिटेल्स समोर आले आहेत. असं कळतंय की याआठवड्यात साजिद खान व्यतिरिक्त कोणीही 'बिग बॉस' मधून बाहेर पडणार नाही. असाच दावा 'द खबरी'ने ट्विटरवर दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे.

'द खबरी'ने ट्विटरवर ही माहिती दिली आहे की, साजिद खान घरातून बाहेर पडत असल्याचं म्हटलं आहे. या बातमीने अनेकांना नक्कीच आनंद झाला असेल कारण बिग बॉसमध्ये मीटू आरोपी साजिद खानच्या एंट्रीबाबत सुरुवातीपासूनच गदारोळ सुरू आहे. ही बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.  
 

निर्मात्यांसोबत झाली होती डील?
साजिद खान या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी एक होता. मात्र, निर्माते त्याला घरातून बाहेर काढणार नाहीत, असे बोललं जात होते आणि त्यानं निर्मात्यांसोबत मोठी डील केल्याचं बोललं जात होते. साजिद या घरात अनेकवेळा नॉमिनेट झाला आणि प्रत्येक वेळी तो टिकून राहिला. खरं तर, या आठवड्यात नॉमिनेटेड स्पर्धकांच्या यादीत साजिदचं नाव येताच, त्याला वाचवण्यासाठी व्होटिंग लाईंस बंद केल्याचं बोललं जात होतं. कारण साजिदला सर्वात कमी वोट्स मिळतील हे सर्वांना माहीत होते. मात्र, हा फंडा आता चुकीचा असल्याचं दिसत आहे. इतकेच नाही तर या शुक्रवारच्या वॉरच्या निमित्ताने सलमान साजिदवर चांगलाच चिडलेलाही दिसत आहे.

 

मला हे अजिबात आवडलेले नाही...
नुकताच ‘वीकेंड का वार’चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानसाजिद खानला फटकारताना दिसत आहे. सलमान खान साजिदला म्हणतो की, ‘वाढदिवसाच्या मेसेजसाठी तू अख्खा माणूस वापरला आहेस.’ यावर  त्याला आय लव्ह निम्रत असे लिहून हवे होते, म्हणून मी आय लव्ह... केलं,असं साजिद म्हणतो आणि हसायला लागतो. साजिदचं हे हसणं पाहून सलमान खानचा पारा चढतो.  ‘मला हे अजिबात आवडलेले नाही. यापुढे घरात कुणीही असं वागणार नाही. हे आताच थांबवा,’ अशा शब्दांत सलमान साजिदला तंबी देतो.  

Web Title: According to report sajid khan eliminated from bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.