पत्नीला फसवलं, विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बजाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:50 IST2025-11-11T13:44:43+5:302025-11-11T13:50:52+5:30
विवाहित असतानाही अभिषेकने एका लोकप्रिय अभिनेत्रीला डेट केले होते.

पत्नीला फसवलं, विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बजाज
'बिग बॉस १९'मधून नुकताच अभिनेता अभिषेक बजाज बाहेर पडला. 'बिग बॉस'च्या घरात असताना अभिषेक कायम चर्चेत असायचा. त्यामध्ये अशनूर कौरबरोबरचं नातदेखील त्यापैकी एक कारण असायचे. अलीकडे तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला. असा दावा केला जात आहे की, विवाहित असतानाही अभिषेकने एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीला डेट केले होते. खुद्द त्याच्या माजी पत्नीनेच याचा खुलासा केला आहे.
विवाहित असतानाही अभिषेकने एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीसोबत गुपचूप डेटिंग सुरू ठेवली होतं, याचा दावा त्याची माजी पत्नी अंकाशा जिंदालनं केलाय. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून, तिच्या हॉट लूकसाठी प्रसिद्ध असणारी डोनाल बिश्त (Donal Bisht) आहे. आकांक्षाने अभिषेकवर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. तिने स्पष्ट केले होते की, अभिषेक त्यांच्या लग्नादरम्यानही दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता आणि ही गोष्ट त्याने तिच्यापासून लपवून ठेवली होती.
फार काळ टिकले नाही नाते
रिपोर्ट्सनुसार, अभिषेक आणि डोनल बिश्त यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. लग्नानंतर अभिषेकने डोनलला काही काळ डेट केले खरे, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. या प्रकरणाबद्दल बोलताना, असे म्हटले जाते की अभिषेक डोनाल बिश्तबद्दल फारसा गंभीर नव्हता. म्हणूनच, डोनालनेच त्याच्याशी ब्रेकअप करणे योग्य मानले. डोनाल बिश्तसोबतच्या ब्रेकअपनंतर, अभिषेकची पत्नी आकांक्षा हिने त्याला जगासमोर उघड केले. तिने स्पष्टपणे सांगितले की, अभिषेकने त्यांच्या लग्नाकडे कधीही लक्ष दिले नाही आणि तो सतत तिला फसवण्याचा प्रयत्न करत होता.