'रंग माझा वेगळा' मालिकेनंतर आता अभिज्ञा भावे झळकणार हिंदी मालिकेत, पहा तिचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 15:45 IST2021-04-24T15:39:18+5:302021-04-24T15:45:14+5:30

‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.

Abhijna bhave will seen in bawara dil hindi serial | 'रंग माझा वेगळा' मालिकेनंतर आता अभिज्ञा भावे झळकणार हिंदी मालिकेत, पहा तिचा लूक

'रंग माझा वेगळा' मालिकेनंतर आता अभिज्ञा भावे झळकणार हिंदी मालिकेत, पहा तिचा लूक

‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या व्हॅकेशचे आणि आगामी प्रोजेक्टची फोटो ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. अभिज्ञा भावेने  इन्स्टाग्राम अकाऊटंवर  तिचा आगामी मालिकेतील लूक शेअर केला आहे. अभिज्ञा कर्लस हिंदी चॅनेलवरील मालिकेत दिसणार आहे. यात मालिकेत ती जान्हवी नावाची भूमिका साकारणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बावरा दिल या मालिकेत अभिज्ञा झळकणार आहे.

याआधी २०१० साली ‘प्यार की ये एक कहाणी’ या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने अनेक मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. गेल्यावर्षी ती रंग माझा वेगळा या मालिकेत झळकली होती. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

अभिज्ञा भावे गेल्या जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. मेहुल पै याच्यासोबत अभिज्ञाने लग्नगाठ बांधली. अभिज्ञाच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

Web Title: Abhijna bhave will seen in bawara dil hindi serial