अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलची जोडी जमली; नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार, चाहते म्हणाले- "रुपेरी वाळूत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:30 IST2025-11-25T12:29:42+5:302025-11-25T12:30:01+5:30
महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आणि लावणी क्वीन गौतमी पाटील एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरुन एक Ai व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलची जोडी जमली; नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार, चाहते म्हणाले- "रुपेरी वाळूत..."
महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आणि लावणी क्वीन गौतमी पाटील एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरुन एक Ai व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि अभिजीत गौतमीचा एआय लूक फोटो दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने कमिंग सून असं साजेस कॅप्शन देखील दिलं आहे.
२०२५ हे वर्ष गायक अभिजीत सावंतसाठी अगदीच खास ठरलं. या वर्षात त्याने अनेक ट्रेंडिंग गाणी केली. संगीत विश्वात २० वर्ष पूर्ण करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित केलं. कायम एव्हरग्रीन गायक असलेला अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्याने नुकतंच आतच्या तरुणाईसाठी मोहब्बत लुटाऊंगा या त्याचा सदाबहार गाण्याचं नवं कोर व्हर्जन देखील गायलं. अभिजीतने आजवर त्याचा आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे.
लावणीच्या अदांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या गौतमी पाटीलसोबत अभिजीत लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हे कोणतं नवं गाणं असणार आहे? हा प्रश्न प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला तरी लवकरच याच उत्तर प्रेक्षकांना मिळणार असल्याचं कळतंय. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी हे "रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना..." या गाण्याचं नवं व्हर्जन असल्याचा अंदाज लावला आहे.