IIT शिक्षण, टीव्हीवरही चमकला अन् मायक्रोसॉफ्टच्या नोकरीला रामराम करत IPS अधिकारी झाला वर्ध्याचा पठ्ठ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:55 IST2025-11-12T16:50:19+5:302025-11-12T16:55:49+5:30
जिद्द आणि चिकाटी मनात असली तर माणूस असाध्य ते साध्य करु शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा अभिनेता आहे.

IIT शिक्षण, टीव्हीवरही चमकला अन् मायक्रोसॉफ्टच्या नोकरीला रामराम करत IPS अधिकारी झाला वर्ध्याचा पठ्ठ्या
IPS Abhay Daga: मनोरंजन विश्वात रोज नवनवे चेहरे पाहायला मिळतात. त्यातील काहींना यश मिळतं तर काही निराश होऊन परत निघून जातात. मात्र, पण काहीजण असे असतात जे प्रेक्षकांच्या मनावर कामयची छाप सोडून जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे अभय डागा. पहिल्याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला हा अभिनेत्याने ग्लॅमर जगतात हरवून जाता एक नवीन दिशा निवडली.
मुळचा महाराष्ट्राचील वर्ध्यातील असलेल्या अभयने साल २०१८ मध्ये, त्याने स्टार प्लसवरील लोकप्रिय टीव्ही शो ‘सिया के राम’ मध्ये शत्रुघ्नची भूमिका साकारली होती. या मालिकेमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील त्याचे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले होते. अभय डागाने २०१३ मध्ये जेईई परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर पुन्हा आयटी क्षेत्रात तो परत गेला आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं.
कोविड काळात संपूर्ण जगाचा कारभार थांबला असताना अभयने एक निर्णय घेतला. त्याने मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या कंपनीतील नोकरी सोडून पूर्णवेळ यूपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पण, त्याची मेहनत फळाला आली. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी 2023 साली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा क्रॅक केली आणि संपूर्ण देशात 185वी रँक मिळवली. अभयचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे.