आशका गोराडियाच्या योगा पोझेस व्हायरल, पाहा तिचे फिटनेस फ्रिक खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:00 IST2019-07-25T06:00:00+5:302019-07-25T06:00:00+5:30

आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Aashka Goradia has been trending with her newfound love for fitness and yoga | आशका गोराडियाच्या योगा पोझेस व्हायरल, पाहा तिचे फिटनेस फ्रिक खास फोटो

आशका गोराडियाच्या योगा पोझेस व्हायरल, पाहा तिचे फिटनेस फ्रिक खास फोटो


'बिग बॉस सीजन 6' ची एक्स कंटेस्टंट आशका गरोडिया लग्नानंतर सतत चर्चेत असते.आशका आपल्या कामाविषयी कमीची तिच्या  तिच्या फिटनेस व्हिडीओमुळेच जास्त चर्चेत असते.नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियापेजवर योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा वेगवेगळ्या योगासने करताना दिसतेय. तसेच योगा करताना ती बिकीनीमध्ये पाहायला मिळतेय. सोशल मीडियावर तिचे हे फिटनेस फ्रिक फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. ती एकटीच योगा करत नसून तिचा ब्रैड गोब्‍लेसह ती योगा करताना पाहायला मिळते.

पतीसह योगा करत असतानाचे फोटो शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. प्रेम, आत्मविश्वास आणि आयुष्य यावर तिने आपले मत मांडले आहे. आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आशका गोराडिया ने बॉयफ्रेंड ब्रैड गोब्‍लेसह  3 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकली होती.क्रिश्‍चन -हिंदु दोन्ही पारंपरिक पद्धतीने तिचे लग्न झाले होते. आशकाने 'अचानक 37 साल बाद' मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. यानंतर ती 'एक्टिंग-एक्टिंग', 'बिग बॉस', 'बाल वीर', 'नच बलिए' आणि 'कुसुम', 'क्‍योंकि सास भी कभी बहू थी' आणि नागिन मध्ये झळकली होती. 

Web Title: Aashka Goradia has been trending with her newfound love for fitness and yoga