"सूरज जिंकला तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन", अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 10:05 IST2024-08-20T10:03:56+5:302024-08-20T10:05:06+5:30

'बिग बॉस मराठी'च्या घरात होणाऱ्या वादांमुळे स्पर्धक चर्चेत आहेत.

aarti solanki on Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan | Riteish Deshmukh | "सूरज जिंकला तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन", अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत

"सूरज जिंकला तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन", अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत

'बिग बॉस मराठी'चा पाचव्या सीझनने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. पहिल्या दिवसांपासून 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणाऱ्या वादांमुळे स्पर्धक चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये रिल्स स्टार सूरज चव्हाणने एन्ट्री घेतलेली आहे. सूरजचा  गुलिगत पॅटर्न बघून कलाकार आणि प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत. अनेक जण त्याला सपोर्ट करत आहेत. पण, यातच एका अभिनेत्रीने सूरजबद्दल केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

अभिनेत्री आरती सोळंकीने 'अल्ट्रा बझ मराठी' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सूरज चव्हाणविषयी आपले मत मांडले आहे. आरती सोळंकी ही बिग बॉसच्या पहिल्या पर्वा सामील झाली होती. सूरजबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी साधा, भोळा, गरीब मी इथून आलोय, तिथून आलोय असं म्हणून नाही चालत. कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप कठीण आहे. त्यामुळे माझी सहानुभूती या गोष्टीला अजिबात नाही".

पुढे ती म्हणाली,  "मी सुद्धा गरीब आहे, चाळीतली पोरगी आहे. त्यामुळे एखादा गरीब कुणीतरी जिंकला तर मला आवडेल. मी स्वामींच्या चरणी त्याच्यासाठी प्रार्थना करेन की त्याला या कार्यक्रमातून आणखी फेम मिळू दे.  जिथे आता 80 हजार घेतोय तिथे 8 लाख घेऊ दे. पण काहीच खेळ न खेळता, काहीच न करता तो पुढपर्यंत गेला आणि जिंकला तर मी तरी पुढचा सिझन बघणार नाही. हे मी आताच स्पष्ट करतेय. कारण तो गेम खूप कठीण आहे. मग तुम्ही सगळे गरीब घ्या, मग मलाही बोलवा, कारण मी पण गरीब आहे. असे नाही होऊ शकतं. जो खेळाडू वृत्तीचा आहे. तो जिंकावा".


Web Title: aarti solanki on Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan | Riteish Deshmukh