बोंबला बोल्ड पोझ देणं आलं अंगाशी, ‘Oops’ मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली गोविंदाची भाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:29 IST2021-05-24T14:27:42+5:302021-05-24T14:29:12+5:30

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंग (Arti Singh) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Aarti singh slipped leg oops survived being a victim of the movement see bold pics | बोंबला बोल्ड पोझ देणं आलं अंगाशी, ‘Oops’ मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली गोविंदाची भाची

बोंबला बोल्ड पोझ देणं आलं अंगाशी, ‘Oops’ मोमेंटची शिकार होता होता थोडक्यात बचावली गोविंदाची भाची

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंग  (Arti Singh)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरती आपल्या बोल्ड फोटोना घेऊन नेहमीच चर्चेत असते. आरतीचा फोटोंमधील अंदाज देखील तिच्या चाहत्यांना आवडत असतो. अलीकडेच आरतीने बिकिनीमध्ये जेट स्कीवर पोझ देण्याचा प्रयत्न केला.  

आरती सिंगने मालदीव व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आरतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या  बिकिनीमध्ये दिसत आहे. आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘Oops’ मोमेंटची शिकार होता होता वाचली 
आरतीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वॉटर जेट स्कीवर उभे असताना पोझ देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र जेटवर तिचा तोल गेला. आरतीचा हा अंदाज पाहून वाटतेय की ती ‘Oops’ मोमेंटची शिकार होताना थोडक्यात बचावली. 

ऐवढेच नाही तर हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, मी पोझ देण्याचा प्रयत्न केला आणि मग हार मानली. काही यूजर्स तिचे हे फोटो बघून चांगलेच भडकले आहेत. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशी कमेंट एका यूजरने केली आहे. आरती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आहे. आरतीने २००७ साली मायका या मालिकेतून कारकीर्दीची सुरूवात केली होती. आरती सिंगचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

Web Title: Aarti singh slipped leg oops survived being a victim of the movement see bold pics