मुलीच्या जन्माच्या एक वर्षानंतर अभिनेता आमिर अलीने दिली वडील झाल्याची खुशखबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:12 IST2020-08-31T16:50:39+5:302020-08-31T17:12:30+5:30

आमिरची मुलगी आर्या एक वर्षांची झाली आहे.

Aamir ali daughter turns one years old actor shared photo first time sanjeeda shaikh | मुलीच्या जन्माच्या एक वर्षानंतर अभिनेता आमिर अलीने दिली वडील झाल्याची खुशखबर!

मुलीच्या जन्माच्या एक वर्षानंतर अभिनेता आमिर अलीने दिली वडील झाल्याची खुशखबर!

टीव्ही अभिनेता आमिर अलीने पहिल्यांदा आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आमिरची मुलगी आर्या एक वर्षांची झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरोगसीच्या माध्यमातून आमिर आणि संजीदा शेख आई-बाबा झाले. आमिरने मुलगी एक वर्षांची झाल्यानंतर वडील होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 30 ऑगस्टला आमिरच्या मुलीचा वाढदिवस होता.

1 वर्षांची झाली आमिरची मुलगी 

आमिरने मुलीसोबतचो 2 फोटो शेअर केले आहेत. याफोटोंमध्ये बाप-लेकीमधील बॉन्डिंग दिसतेय. कॅप्शनमध्ये आमिरने लिहिले, परी कशी दिसते हे माहित नव्हते, जोपर्यंत मी माझ्या मुलीला पाहिलं नव्हतं. स्वर्गातून माझी मुलगी या जगात आली. पहिल्या नरजेतील प्रेमावर विश्वास नव्हता जोवर मी माझ्या मुलीला पाहिलं नव्हतं. या 1 वर्षात बरेच काही झाले. माझ्या छोट्याशा मुलीने मला बळ दिले. माझ्या प्रेमा, माझे आयुष्य 1 वर्ष पूर्ण झाले. आर्या अली.


आमिर अलीचा हा फोटो जोरदार व्हायरल होतो आहे. आमिर अलीने वडील होण्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे तेव्हापासून चाहत्यांसह टीव्ही सेलेब्स त्याचे अभिनंदन करत आहेत. करिश्मा तन्ना, मौनी रॉय, क्रिस्टल डिसूजा, जसवीर कौर, आमना शरीफ, जय भानुशाली, अनीता हसनंदानी, हिमांश कोहली, हितेन तेजवानी, शमिता शेट्टी, माही विज ने आमिरच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Aamir ali daughter turns one years old actor shared photo first time sanjeeda shaikh