'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं देवदर्शन; नवीन वर्षानिमित्त केला खास संकल्प, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 18:42 IST2024-01-01T18:40:03+5:302024-01-01T18:42:34+5:30

अश्विनीच्या नवीन वर्षाचा संकल्प ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 

aai Kuthe Kya Karte fame Actress Ashwini Mahangde special resolution for the new year | 'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं देवदर्शन; नवीन वर्षानिमित्त केला खास संकल्प, म्हणाली...

'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं देवदर्शन; नवीन वर्षानिमित्त केला खास संकल्प, म्हणाली...

 नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधी अनेक जण नवीन वर्षाचे संकल्प करतात. हे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील लोक करतात.  'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने नवीन वर्षाचा खास संकल्प केला आहे.  ऐवढचं नाही तर संकल्पपुर्तीच्या दिशेने तिने एक पाऊलही टाकलं आहे. अश्विनीच्या नवीन वर्षाचा संकल्प ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 

अश्विनी महांगडेने कुटुंबासोबत कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात देवदर्शन घेतलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. यासोबत तिनं नवीन वर्षाचा संकल्प चाहत्यांसोबत शेअर केला. अश्विनी लिहले, 'इंग्रजी नवीन वर्षात काय नवीन संकल्प करावा बरं? असे मनात आले आणि आम्ही संकल्प केला की महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड- किल्ले यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. सुरुवात केली ....... १. जोतिबा मंदिर, कोल्हापूर'.

अश्विनीच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहले, 'काय सुंदर सुरुवात केली आहे'. तर एका युजरने म्हटलं, 'मगं बोला जोतिबाच्या नावानं चांगभलं'. अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अश्विनीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकेत तिने साकारलेली 'राणू अक्का' ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आगामी प्रोजेक्टची माहिती ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते. अश्विनी अनेक समाजपयोगी कार्यक्रमातही सहभाग घेताना दिसते. सध्या अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते आहे. तिला या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. 

Web Title: aai Kuthe Kya Karte fame Actress Ashwini Mahangde special resolution for the new year