'आई कुठे..' मालिकेत पुन्हा ट्विस्ट; आशुतोष अरुंधतीच्या नाही तर ;अनुष्का'च्या प्रेमात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:06 IST2022-12-31T17:04:38+5:302022-12-31T17:06:11+5:30

आई कुठे काय करते मालिकेत दिवसेंदिवस एकापेक्षा एक घडामोडी घडत आहेत. सध्या मालिकेत आशुतोषची बालपणीची मैत्रिण अनुष्का आली आहे.

aai-kuthe-kay-karte-serial-twist-and-turns-happening-in-next-episodes-as-anushka-proposes-ashutosh | 'आई कुठे..' मालिकेत पुन्हा ट्विस्ट; आशुतोष अरुंधतीच्या नाही तर ;अनुष्का'च्या प्रेमात ?

'आई कुठे..' मालिकेत पुन्हा ट्विस्ट; आशुतोष अरुंधतीच्या नाही तर ;अनुष्का'च्या प्रेमात ?

आई कुठे काय करते मालिकेत दिवसेंदिवस एकापेक्षा एक घडामोडी घडत आहेत. सध्या मालिकेत आशुतोषची बालपणीची मैत्रिण अनुष्का आली आहे. एकीकडे अनुष्काचे आशुतोषवर प्रेम आहे मात्र आशुतोष अरुंधतीची वाट पाहतोय. आता मात्र मालिका रंजक वळणावर आली आहे कारण अरुंधतीचं काहीच उत्तर येत नसल्याने आशुतोष अनुष्काचा स्वीकार करतो की काय असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अनुष्का आणि आशुतोष डिनर डेट वर गेले आहेत. दरम्यान आशुतोष अनुष्काला विचारतो, 'तू इतक्या वर्षांनी मुंबईत परत का आली आहेस ? खरं खरं सांग' यावर अनुष्का थोडी घाबरते. ती म्हणते, ' मी तुझ्यासाठीच आली आहे. मला तू आवडतोस.' असे म्हणत ती आशुतोषसमोर आपल्या प्रेमाची कबुली देते. हे ऐकून आशुतोषलाही धक्का बसतो. तो म्हणतो, अनुष्का, तू खरं उत्तर दिलं त्याबद्दल थॅंक्यू. मला आवडतेस'  इथेच प्रोमो संपतो. 

आशुतोषच्या या उत्तराने प्रेक्षक संभ्रमात पडले आहेत . अरुंधतीवर जीवापाड प्रेम असताना आशुतोष असं का म्हणाला हा प्रश्न इथे पडतोय. याचे उत्तर पुढील एपिसोडमध्येच मिळेल. एकीकडे अनिरुद्ध आणि संजनाचं नातं बिघडत असताना दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे. त्यातच आता अनुष्काची एंट्री झाल्याने मालिका पुन्हा रंजक वळणावर आली आहे. अनुष्कामुळे अरुंधती आणि आशुतोष मधलं नातं बिघडतं की ते अजूनच जवळ येतात हे बघणं महत्वाचं आहे. 

Web Title: aai-kuthe-kay-karte-serial-twist-and-turns-happening-in-next-episodes-as-anushka-proposes-ashutosh