आई कुठे काय करते मालिका नव्या वळणावर, अनिरुद्ध घेणार संजनापासून घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:25 IST2022-06-13T11:19:21+5:302022-06-13T11:25:11+5:30

Aai Kuthe Kay Karte : गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात तणाव आलेला दिसतोय.

Aai Kuthe Kay Karte serial on a new turn, Aniruddha will give divorce to Sanjana? | आई कुठे काय करते मालिका नव्या वळणावर, अनिरुद्ध घेणार संजनापासून घटस्फोट?

आई कुठे काय करते मालिका नव्या वळणावर, अनिरुद्ध घेणार संजनापासून घटस्फोट?

 आई कुठे काय करते या मालिकेने उत्तम कथानक आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका टीआरपी आणि लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात तणाव आलेला दिसतोय. अनिरुद्ध संजनासोबतचं नातं संपवण्याच्या विचारता दिसतोय.  
 
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात संजना अनिरुद्धसाठी वटपौर्णिमेची पूजा करताना दिसतेय. यावेळी अनिरुद्ध तिला सात जन्म काय तर सात महिने सुद्धा आपलं नातं टिकले की नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करताना दिसतोय. 

संजना वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या अनघाला सात जन्माची पूजा नीट कर अभीसाठी आधी अंकिता होती आता तू आहेस म्हणून आपलं म्हटलं असे टोमण्यात बोलते इतक्यात तिथं उभा असलेला अनिरुद्ध तिला टोकतो. संजना तू पूजा करतेस पण पुढचे सात महिने सुद्धा आपण एकत्र नसणार असं म्हणतं तिची बोलती बंद करतो. तर अरुंधतीला तिला या जन्मी तरी अनिरुद्ध तुझ्यासोबत असवे हिची सदिच्छा असं म्हणते. काय असेल अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याचे भविष्य?, अनिरुद्ध संजनापासून घटस्फोट घेणार का?, दोघांचं नात्याला पूर्णविराम लागणार का?, या मालिकेत पुन्हा कोणतं नवं वळण पाहायला मिळणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte serial on a new turn, Aniruddha will give divorce to Sanjana?