'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:54 AM2022-07-01T10:54:44+5:302022-07-01T11:01:59+5:30

'आई कुठे काय करते' अरुंधती यशला आपल्याला सगळं कळल्याचं सांगते आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहते.

Aai kuthe kay karte serial Arundhati and Aniruddha stand firmly behind Yash | 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी देशमुखांच्या घरात आनंदाचे क्षण येतात तर काही वेळा सतत भांडणतंटे होत असल्याचं दिसून येतं. सध्या घरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे. यशवर निलच्या खुन आरोप लावण्यात आला आहे. पिकनीकला गेलेले असताना नील इशावर जबरदस्ती करतो. त्यामुळे संतापलेला यश त्याला मारतो आणि यात त्याच्या मृत्यू होतो.

सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात अरुंधती आणि अनिरुद्ध यशाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. यशला विश्वास देतात की आम्ही सगळे तुझ्या मागे उभे आहोत. 

अरुंधती यशला आपल्याला सगळं कळल्याचं सांगते आणि काहीही झालं तर आपण यश आणि इशाच्या बरोबर असल्याचे सांगते. तर अनिरुद्ध काहीही वाईट होणार नाही मी सगळं स़ंभाळून घेईन असा विश्वास त्याला देतो. यश अरुंधतीला तिचा त्याच्यावर विश्वास आहे ना हे विचारतो.

अरुंधती यशला आपला स्वत:पेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास असल्याचं सांगते. त्यामुळे आता संपूर्ण देशमुख कुटुंब यश आणि इशाच्या मागे या संकटात ठामपणे उभे राहिले आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यशला या संकटातून बाहेर काढू शकतील का?, यशला निर्दोष सिद्ध करु शकतील का?, या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.
 

Web Title: Aai kuthe kay karte serial Arundhati and Aniruddha stand firmly behind Yash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.