"पुढच्या प्रवासाला निघाले..", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 11:33 IST2023-07-08T11:22:37+5:302023-07-08T11:33:16+5:30

रुपाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आजच तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

Aai kuthe kay karte fame rupali bhosale latest post viral check why | "पुढच्या प्रवासाला निघाले..", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत

"पुढच्या प्रवासाला निघाले..", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आप्पा, कांचन आई, अनिरुद्ध, अरुंधती, संजना, अभी, संजना, यश, अनघा, ईशा आणि गौरी या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने साकारली आहे. रुपाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आजच तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अलिकडेच रुपालीने गायक सुरेश वाडकर आणि त्यांच्या पत्नी पद्मा वाडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

रुपालीची पोस्ट
अभिनेत्री लिहिते की, ''तुमचा आशिर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले आणि मला खात्री आहे हा प्रवास सुखकर होणार. आम्ही आजही एन्जॉय करतो अशी अप्रतिम गाणी देण्यासाठी खूप आभार. या मनोरंजन विश्वाचा मी एक भाग आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते.'' अभिनेत्रीने 'पुढच्या प्रवासाला निघाले' असं म्हटल्याने ती 'आई कुठे काय करते' सोडणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

रुपालीच्या या पोस्टनंतर ती ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोडणार की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे ती नवीन काय करणार आहे याबाबतही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

दरम्यान रुपालीने अजून कोणत्याही नव्या तिच्या नव्या प्रोजेक्टबाबत माहिती दिलेली नाही. रुपाली भोसले हिने आई कुठे काय करते या मालिकेव्यतिरिक्त बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती. तसेच ती बिग बॉस मराठीच्या घरातही पहायला मिळाली होती.


 

Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosale latest post viral check why