'आई कुठे काय करत' मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक पाहिलात का ?, फोटोची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:37 IST2021-12-03T17:16:04+5:302021-12-03T17:37:59+5:30

आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar share her beautiful photo | 'आई कुठे काय करत' मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक पाहिलात का ?, फोटोची होतेय चर्चा

'आई कुठे काय करत' मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक पाहिलात का ?, फोटोची होतेय चर्चा

आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेत आई म्हणजेच अरुंधती देशमुखची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. तिच्या कामाचे खूप कौतुक होताना दिसते. 

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर अलीकडेच तिचा बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूप भावताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोना दिसतो आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.


तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे. याबद्दल मधुराणीने मुलाखतीत सांगितले की, इतका मोठा ब्रेक घेण्यामागे कारणदेखील खास आहे. तिला ६ वर्षांची मुलगी आहे आणि तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून तिने मोठा ब्रेक घेतला होता. आता तिला आई कुठे काय करते या मालिकेचा विषय आणि मांडणी आवडल्यामुळे मधुराणीने या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar share her beautiful photo