ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 07:00 IST2022-08-17T07:00:00+5:302022-08-17T07:00:01+5:30

ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती' या तिघींमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar and Hruta Durgule, Shivani Baokar special connection | ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या मालिकांच्या गर्दीत अशा काही मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातल्याच दोन मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte)  मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. या मालिकेतील अनिरुद्ध, अरुंधती, ईशा, यश, अभिषेक, अनघा, गौरी, आप्पा, कांचन आई, संजना आणि शेखर या कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. याशिवाय सध्या या मालिकेत आशुतोषने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेले दोन ते अडीच वर्षे ही मालिका सुरु आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar) ही अरुंधतीची भूमिका साकारत आहेत. तुम्हाला माहिती आहे का मधुराणीचं मन उडू उडू झालं फेम ह्रता दुर्गुळे आणि लागिरं झालं जी फेम शिबानी बावकरसोबत खास नातं आहे. विशेष म्हणजे ह्रता दुर्गुळे, शिबानी बावकर आणि मधुराणी यांच्यात एक नातं असून फार मोजक्या जणांना ते ठावूक आहे. या खास नात्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

काय आहे अरुंधती आणि ह्रता, शिवानीचं नात? 
अरुंधती म्हणजेच मधुराणी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रशिक्षकदेखील आहे. मधुराणी आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची मिरॅकल्स अ‍ॅक्टींग ही अ‍ॅकॅडमी चालवतात. त्यांच्या या अ‍ॅकॅडमीमध्ये आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ह्रता दुर्गुळे आणि शिवानी बावकर हे त्यांचे विद्यार्थी आहेत.  याच संस्थेत त्यानी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. मधुराणीच्या संस्थेमधून आतापर्यंत  गिरिजा प्रभू, किरण गायकवाड, निखिल चव्हाण या कलाकारांनी अभिनय शिकला आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar and Hruta Durgule, Shivani Baokar special connection