'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 18:37 IST2021-08-17T18:37:13+5:302021-08-17T18:37:38+5:30

'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Aai Kuthe Kay Karte fame Actress will be seen in Hindi serial | 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकणार पहिल्यांदाच हिंदी मालिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच हिंदी मालिकेत काम करताना दिसणार आहे. सोनी टेलिव्हिजनवरील मालिका मेरे साई या मालिकेतून अश्विनीने हिंदी मालिकेत पदार्पण केले आहे. 

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मेरे साई. माझा पहिला हिंदी प्रोजेक्ट. मेरे साई मालिका सोनी टेलिव्हिजनवर सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसारीत होते. या मालिकेसाठी उत्सुक आहे. या मालिकेत अश्विनीने तेजस्वीची भूमिका साकारली आहे. अश्विनीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेतील तिच्या अनघाच्या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे. 


या व्यतिरिक्त अश्विनी महांगडेने अस्मिता मालिकेत काम केले आहे. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत राणू आक्काची भूमिका तिने साकारली. तिने साकारलेली ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती. अश्विनी टपाल आणि बॉईज या मराठी चित्रपटात झळकली आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte fame Actress will be seen in Hindi serial