आता काय करते 'आई कुठे...'ची ईशा? ट्रेंडिंग गाण्यावर बनवला रील, मालिका संपल्यानंतर स्वॅगच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:58 IST2025-07-13T15:58:04+5:302025-07-13T15:58:34+5:30
आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. या मालिकेतूनच तिला प्रसिद्धी मिळाली.

आता काय करते 'आई कुठे...'ची ईशा? ट्रेंडिंग गाण्यावर बनवला रील, मालिका संपल्यानंतर स्वॅगच बदलला
'आई कुठे काय करते' ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेल्या आणि गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेतील सगळ्याच पात्रांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. या मालिकेतूनच तिला प्रसिद्धी मिळाली.
अपूर्वाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. ती चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट्स देत असते. अनेकदा अपूर्वा सोशल मीडियावरील ट्रेंडही फॉलो करताना दिसते. नुकतंच तिने मन तुझं जलतरंग गाण्यावर रील बनवला आहे. या रीलमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज घालत फॅशन केली आहे. या व्हिडिओत अपूर्वाचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे.
अपूर्वाची ही रील चाहत्यांच्याही पसंतीस उतरली आहे. तिच्या या रीलवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मालिका संपल्यानंतर अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. दरम्यान, मन तुझं जलतरंग ही वैभव जोशींची कविता इन्स्टाग्रामवर ट्रेंडिग आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनीही रील बनवला आहे.