"लग्नासाठी मुलं पाहतेस का?", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला चाहत्याचा प्रश्न, म्हणाली- "हो, म्हणूनच तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:45 IST2026-01-05T12:44:37+5:302026-01-05T12:45:19+5:30
गौरी चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक लाइफमधील अपडेट्स देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने गौरीला थेट तिच्या लग्नाबद्दलच विचारलं.

"लग्नासाठी मुलं पाहतेस का?", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला चाहत्याचा प्रश्न, म्हणाली- "हो, म्हणूनच तर..."
'आई कुठे काय करते' ही टेलिव्हिजनवरील अतिशय गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली मालिका. या मालिकेने काही कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेतील सगळ्याच कलाकारांवर चाहत्यांनीही भरभरुन प्रेम केलं. 'आई कुठे काय करते' मालिकेत यशची गर्लफ्रेंड गौरी हे पात्र साकारून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली. गौरीने मालिकेतून मध्येच एक्झिट घेतली होती. मात्र तिची लोकप्रियता कमी झाली नाही. गौरीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
गौरी चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक लाइफमधील अपडेट्स देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ask me सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने गौरीला थेट तिच्या लग्नाबद्दलच विचारलं. "लग्नासाठी खरंच मुलं पाहायला जातेस का?" असा प्रश्न चाहत्याने गौरीला विचारला. या प्रश्नाचं तिने उत्तर दिलं. "हो त्यासाठीच तर तयार होते मी", असं म्हणत गौरीने हसण्याचे इमोजी पोस्ट केले.

गौरीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. काही नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी गौरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत होती. पण, अभिनयात करिअर करायचं म्हणून तिने नोकरी सोडली. 'आई कुठे काय करते' मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. 'प्रेमास रंग यावे' मालिकेतही ती दिसली होती.