'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती लगावणार साहिलच्या कानाखाली, दाखवणार त्याला त्याची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:31 IST2022-06-07T13:06:25+5:302022-06-07T13:31:21+5:30

Aai kuthe kay karte :अरुंधती इशाच्या पाठीशी ठामपणे उभी राहून, साहिलला दाखवून देणार त्याची खरी जागा

Aai kuthe kay karte episodic new twist will come in serial | 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती लगावणार साहिलच्या कानाखाली, दाखवणार त्याला त्याची जागा

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती लगावणार साहिलच्या कानाखाली, दाखवणार त्याला त्याची जागा

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक आगामी भागाविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इतकंच नाही तर अरुंधतीच्या मुलांच्या भविष्यावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीचं इशा आणि साहिल यांचं ब्रेकअप झालं होतं.

सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यात साहिल इशाला झिडकारताना दिसतोय. त्यावेळी तिथे अरुंधती हजर होते आणि साहिलला जाब विचारते आणि त्याच्या कानशिलात मारते.

आमच्या घरात इशासारखी मुलगी सून म्हणून चालणार नसल्याचे साहिला सांगतो. हिच्या आई-बाबांचा घटस्फोट झालाय यात इशाची काय चूक आहे असे अरुंधती त्याला विचारते. माझ्या मुलीच्या अंगाला हात लावण्याची तुझी हिम्मतच कशी झाली असं म्हणतं अरुंधती तिच्या कानशिलात लगावतं त्याला त्याची जागा दाखवून देते. 

दरम्यान, एकीकडे अरुंधती तिच्या आयुष्यात पुढे जात आहे. तर, देशमुख कुटुंबासोबत ती नसल्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती एकाकी पडली आहे. प्रत्येकाच्या जीवनाची घडी विस्कटली आहे. त्यामुळे मालिकेत येणाऱ्या या रंजकदार वळणामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, आता अरुंधती, इशा आणि साहीलचं नातं वाचवू शकेल का? हे येत्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: Aai kuthe kay karte episodic new twist will come in serial