यशला वाचवण्यासाठी आशुतोषच्या आईचा पुढाकार; सुलेखाताई लढणार यशची केस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:35 IST2022-07-06T15:34:32+5:302022-07-06T15:35:08+5:30
Aai kuthe kay karte: पिकनिकला गेलेल्या इशावर नीलने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. जे पाहून रागाच्या भरात यशने त्याच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात नील जखमी झाल्यामुळे यशच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यशला वाचवण्यासाठी आशुतोषच्या आईचा पुढाकार; सुलेखाताई लढणार यशची केस!
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आला आहे. इशाला वाचवणाऱ्या यशवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंब सध्या चिंतेत आहे. यामध्येच यशला या प्रकरणातून सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी अरुंधती, आशुतोष आणि अनिरुद्ध शक्य होतील तितके प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता त्यांना सुलेखाताईंची साथ मिळणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सुलेखाताई यशची केस लढण्यास तयार होतात. त्यामुळे आता यशला त्यांची साथ मिळाली असून कोर्टात त्या त्याच्या बाजूने लढणार आहेत.
दरम्यान, पिकनिकला गेलेल्या इशावर नीलने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. जे पाहून रागाच्या भरात यशने त्याच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात नील जखमी झाला. परंतु, डोक्याला मार लागल्यानंतर अचानकपणे नील आणि त्याच्यासोबत असलेला स्टाफ एकाएकी गायब झाले. त्यामुळे या प्रकरणामागे नक्कीच नीलचा काही तरी हात असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, या प्रकरणात यशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सुलेखाताई त्याची मदत करणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत नेमकं काय घडतं?, यशवरील संकट दूर होईल का? नीलचं सत्य समोर येईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.