Aai Kuthe Kay Karte: अनिरूद्धच्या खऱ्या आयुष्यात लग्नाआधी सासरच्यांनी ठेवली होती 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:00 AM2022-01-13T07:00:00+5:302022-01-13T07:00:00+5:30

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची खऱ्या आयुष्यातील पत्नी लाइमलाइटपासून दूर असते.

Aai Kuthe Kay Karte: In Aniruddha's real life, her father-in-law had set this condition before marriage | Aai Kuthe Kay Karte: अनिरूद्धच्या खऱ्या आयुष्यात लग्नाआधी सासरच्यांनी ठेवली होती 'ही' अट

Aai Kuthe Kay Karte: अनिरूद्धच्या खऱ्या आयुष्यात लग्नाआधी सासरच्यांनी ठेवली होती 'ही' अट

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) टेलिव्हिजनवरील टीआरपीमधील टॉपची मालिका आहे. मालिकेतील कथानक आणि उत्कंठावर्धक वळणामुळे या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. या मालिकेत अनिरूद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali)ने साकारली आहे. मिलिंद गवळीची पत्नी दीपा लाइमलाइटपासून दूर राहते. मात्र त्यांची प्रेमकथा खूपच हटके आहे. 

मिलिंद गवळीने त्याची पत्नी दीपाला पहिल्यांदा जळगाव रेल्वे स्टेशनवर पाहिले होते आणि पहिल्या नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. तेव्हा त्याला ही मुलगी कोण आहे हेदेखील माहिती नव्हते. तिच्या विषयी काहीच माहितीदेखील नव्हती. त्यामुळे ही गोष्ट जळगाव रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली होती. मात्र, पुन्हा या दोघांची भेट एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात झाली. त्यानंतर मिलिंदने तिची सर्व माहिती काढली. नंतर तिचे नाव दीपा असल्याचे समजले.
दीपाची माहिती मिळाल्यानंतर मिलिंदने आपल्या कुटुंबियांना सांगितले. दीपा ही त्यांच्या नात्यातलीच आहे हे त्याला काही दिवसांनी समजले.

मिलिंदच्या घरचे दीपाला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेले. त्यावर दिपाच्या घरच्यांनी मिलिंद समोर एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे. मिलिंद दीपाच्या प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे त्याने त्यांची ही अट मान्य केली. मिलिंद स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आणि त्यानंतर तो परीक्षाही पास झाला. सरकारी नोकरी लागल्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले. दीपा आणि मिलिंद यांना एक लेक आहे. जिचे लग्न झाले आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte: In Aniruddha's real life, her father-in-law had set this condition before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.