Aai Kuthe Kay Karte : अखेर अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची ठरली तारीख, पत्रिका होतेय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 21:08 IST2021-08-18T21:08:09+5:302021-08-18T21:08:43+5:30
'आई कुठे काय करते' मालिका आता नव्या वळणावर आहे.

Aai Kuthe Kay Karte : अखेर अनिरुद्ध-संजनाच्या लग्नाची ठरली तारीख, पत्रिका होतेय व्हायरल
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' आता नव्या वळणावर आहे. मालिकेत अनिरूद्ध आणि अरूंधतीचा घटस्फोट झाला आहे. त्यांचे २६ वर्षांचे नाते अखेर तुटले आहे. तर दुसरीकडे संजना आणि शेखरदेखील विभक्त झाले आहेत. यानंतर आता संजना अनिरूद्धसोबतच्या लग्न करण्यासाठी उतावळी झाली आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील व्हायरल होताना दिसत आहे.
गेली अनेक वर्ष संजना अनिरुद्धसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहत असते. अनिरूद्ध-अरूंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर आपल्या गळ्यात लवकरच अनिरूद्धच्या नावाचे मंगळसूत्र असेल, याची स्वप्ने संजना पाहत आहे. याकरीता आता तिने शॉपिंगला देखील सुरूवात केली आहे.
लग्नाचे नाते अधिक स्पष्ट करण्यासाठी मंगळसूत्र देखील संजनाने खरेदी केले आहे. अनिरूद्ध आणि संजनाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.
चि. अनिरूद्ध यांचा विवाह चि.सौ.का संजनासोबत ठरला आहे. हा विवाह आई कांचन यांची प्रकृती स्थिर असेल तेव्हा योजन्यात आला आहे. विवाह स्थळ संजना ठरवेल तेव्हा आणि विवाह मुहूर्त - शेखर यायच्या आत असे लिहिण्यात आले आहे. तसेच आपले नम्र आई कांचन देशमुख आणि विनायक देशमुख म्हणजे आप्पा. या लग्नाला विशेष उपस्थिती ही अरूंधती देशमुखची असणार आहे. यासोबत एक भावनिक गाणे देखील असणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये छोटे निमंत्रक निखिल, निहार, मीनू, अबोली असून मानाची करवली ही विशाखा असणार आहे. आमच्या पप्पाच्या लग्नाला यायचं हं असं म्हणत ईशा, यश, अभिषेक यांची नावे देण्यात आली आहे.