'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..."

By देवेंद्र जाधव | Updated: June 25, 2025 13:50 IST2025-06-25T13:49:05+5:302025-06-25T13:50:12+5:30

रुपाली भोसलेने चाहत्यांना खास बातमी दिली आहे. त्यामुळे तिच्या सर्व चाहत्यांना आनंद झाला असून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

aai kuthe kay karte actress Rupali Bhosle gave good news to her fans | 'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..."

'आई कुठे..' फेम रुपाली भोसलेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली- "लवकरच मी..."

'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. रुपालीने तीन-चार वर्ष 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं. रुपालीला या मालिकेच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळाली. काही महिन्यांपूर्वी 'आई कुठे काय करते' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच रुपाली भोसलेने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रुपालीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. रुपालीने तिचा एक सेल्फी शेअर केलाय. त्यासोबत ती लिहिते की, "जीवनावर प्रेम करा म्हणजे आयुष्यही तुमच्यावर प्रेम करेल!!! P. S लवकरच येतेय काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक ?? सांगते लवकरच.. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सोबत असणार ह्याची खात्री आहे..." अशाप्रकारे रुपालीने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. रुपाली भोसलेने ही पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट करुन उत्सुकता दर्शवली आहे.


रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती नुकतीच 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसून आली. याशिवाय रुपालीने अलीकडेच एका नाटकात काम केलं. रुपालीने लिहिलेली पोस्ट वाचून ती आता कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. रुपाली आगामी मालिका, सिनेमा किंवा नाटक कोणत्या माध्यमात झळकणार, याचा खुलासा लवकरच होईल. 

Web Title: aai kuthe kay karte actress Rupali Bhosle gave good news to her fans