'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:00 IST2025-09-03T09:59:14+5:302025-09-03T10:00:19+5:30

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडे स्टार प्रवाहवरील या मालिकेत खास भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे

aai kuthe kay karte actress Ashvini Mahangade new serial gharoghari matichya chuli in star pravah | 'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची नवी मालिका, स्टार प्रवाहवरील 'या' मालिकेत दिसणार

'आई कुठे काय करते' मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिका जरी संपली असली तरीही आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण काढतात. 'आई कुठे काय करते' मालिकेतील अशीच एक गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे अनघा. अभिनेत्री अश्विनी महांगडेने अनघाची भूमिका साकारली होती. अश्विनी आता स्टार प्रवाहवरीलच आगामी मालिकेत झळकणार आहे. जाणून घ्या.

अश्विनीची स्टार प्रवाहवर नवी मालिका

अश्विनीने सोशल मीडियावर मेकअप रुममधील फोटो पोस्ट करत ही खास माहिती सर्वांसोबत शेअर केली. अश्विनी आता स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार आहे. अश्विनी या मालिकेत 'माया' ही भूमिका साकारणार आहे. अश्विनीने नव्या मालिकेतील लूक शेअर करत ही खास बातमी सर्वांना सांगितली आहे. अश्विनीच्या नव्या मालिकेमुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. अश्विनी पुन्हा अभिनय करताना दिसणार असल्याने सर्वांनी तिच्या नवीन भूमिकेविषयी उत्सुकता दर्शवली आहे.


अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, २०२३ मध्ये आलेल्या 'महाराष्ट्र शाहिर' सिनेमात अश्विनी झळकली होती. या सिनेमात अश्विनीने अंकुश चौधरीसोबत काम केलं. 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे अश्विनी घराघरात पोहोचली. मालिकेत अश्विनी आणि अभिनेता निरंजन कुलकर्णी या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांंचं चांगलंच प्रेम मिळालं. आता 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत अश्विनी नवीन भूमिका कशी साकारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: aai kuthe kay karte actress Ashvini Mahangade new serial gharoghari matichya chuli in star pravah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.