अभिषेक करणार आईचाच अपमान, मुलीला अरुंधतीकडे देण्यास थेट नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:03 AM2023-03-21T09:03:39+5:302023-03-21T09:04:33+5:30

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' सध्या रंजक वळणावर आहे.

aai kuthe kay karte abhishek insults arundhati in front of everyone says stay away from janaki | अभिषेक करणार आईचाच अपमान, मुलीला अरुंधतीकडे देण्यास थेट नकार

अभिषेक करणार आईचाच अपमान, मुलीला अरुंधतीकडे देण्यास थेट नकार

googlenewsNext

Aai Kuthe Kay Karte : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत अरुंधती आणि आशुतोषचं लग्न झालं असून त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. मात्र या सगळ्यात अनिरुद्ध आणि अभिषेक हे नाखूश आहेत. त्यांना अरुंधतीचा हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. अरुंधतीला नावं ठेवण्याची एकही संधी दोघेही सोडताना दिसत नाहीत. घरी आलेल्या अरुंधतीला तिचाच मुलगा अपमानित करताना दिसणार आहे.

'आई कुठे काय करते' च्या नव्या प्रोमोमध्ये अरुंधती लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आली आहे. कंकण सोडवण्यासाठी अरुंधती आणि आशुतोष घरी आले असता अरुंधती आई आणि आप्पांचे आभार मानते. ती म्हणते, 'आयुष्यभर लक्षात राहिल असं लग्न तुम्ही लावून दिलं आहे.'यावर अनिरुद्ध म्हणतो, 'आई आणइ आप्पांना समाजसेवा करायची सवयच आहे. बाकी तुझ्यासाठी हे सगळं करण्याची गरजच नव्हती. तुझा आता या घराशी काहीच संबंध नाही.' दरम्यान अभिषेक त्याची चिमुकली जानकी हिला घेऊन येतो. जानकीला बघून अरुंधती तिला कडेवर घेण्यासाठी येते तेवढ्यात अभिषेक तिला दूर नेतो. तो आईला जानकीला हातही लावू देत नाही. अशा रितीने अरुंधतीचा पुन्हा घरात अपमान होतो. यावर अनघा मात्र अभिषेकवर चिडते, तू असा का वागतोस असं ती त्याला म्हणते. यावर अभिषेक म्हणतो, 'तिला विचार आई, आजी ही नाती तिला लक्षात तरी आहेत का'. अनघा म्हणते, 'अजून किती दुखावणार आहेस. अशाने तिच्या मनातून तू उतरशील.'

अरुंधतीचा यापुढे अजून किती अपमान होणार हे आता येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. अनिरुद्ध आणखी काय काय खेळी करणार ज्याने अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात कटुता येईल हे बघणं महत्वाचं आहे.

Web Title: aai kuthe kay karte abhishek insults arundhati in front of everyone says stay away from janaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.