अरुंधती बालपणी दिसायची खूपच गोड; पाहा मधुराणीने शेअर केलेला तिचा Childhood photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:00 IST2022-01-24T12:56:54+5:302022-01-24T13:00:22+5:30
Madhurani gokhale-prabhulkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली अरुंधती अनेकदा तिचे सेटवरील वा घरातील फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अरुंधती बालपणी दिसायची खूपच गोड; पाहा मधुराणीने शेअर केलेला तिचा Childhood photo
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेतील अरुंधती आज प्रत्येक घरात लोकप्रिय झाली आहे. स्वभावातील साधेपणा, सोज्वळता आणि प्रत्येकासाठी काही ना काही करण्याची तिची धडपड यामुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेतील अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने साकारली आहे. त्यामुळे अरुंधतीविषयी म्हणजेच मधुराणीविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याकडे प्रेक्षकांचा कल असतो. विशेष म्हणजे मधुराणीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अरुंधती अनेकदा तिचे सेटवरील वा घरातील फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतंय माहितीये का?
मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. तसंच कानात सोनेरी रंगाचे कानातले घातले आहेत. या फोटोमध्ये तिने एक हटके पोझ दिली आहे. विशेष म्हणजे या फोटोसोबतच तिने मालिकेतील एक फोटो कोलाज केला आहे.
दरम्यान, मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. परंतु, यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलंय.