चाहतीची भेटवस्तू पाहून भारावली ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 02:58 PM2023-08-29T14:58:53+5:302023-08-29T15:00:38+5:30

एका चाहतीने पाठवलेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Aai Khe Kya Karte' fame Arundhati overwhelmed by the fan's gift | चाहतीची भेटवस्तू पाहून भारावली ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती

Arundhati

googlenewsNext

आपल्या आवडत्या  प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते सेटवर खास भेटवस्तू पाठवतात. असाच सुंदर अनुभव ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला आला आहे. चाहतीने पाठवलेली भेटवस्तू पाहून मधुराणीला गलबलून आलं.  पाठवलेल्या भेटवस्तूचा व्हिडिओ मधुराणीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

 

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)


चाहतीने मधुराणी प्रभुलकरला स्वतःच्या हाताने काढलेलं चित्र पाठवले आहे. मधुराणीनेचे हिरव्या रंगाच्या साडीवरचे फोटो चाहतीने रेखाटले आहेत. शिवाय, या फोटोफ्रेमसोबत चाहतीने एक कविताही लिहून पाठवली आहे. त्यात लिहलं आहे, "घेईन एक उंच झेप, घेईन एक उंच झेप, क्षितिजांपर्यंत जाइन थेट, बंधनांतून मज मुक्त करावं, वाट पाहते माझी..." 

हा व्हिडिओ शेअर करत मधुराणी प्रभुलकरने लिहिलं, 'इतक्या प्रेमाने इतकं सुंदर पेंटिंग कुणी करून पाठवल्यावर मन इतकं भरून येतं की डोळयातून वाहून जातं. शिल्पा पवार ह्या कलावतीचे खूप खूप आभार. आणि उदंड प्रेम'. मधुराणी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करत असते.

Web Title: Aai Khe Kya Karte' fame Arundhati overwhelmed by the fan's gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.