"नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:21 IST2023-10-10T13:21:08+5:302023-10-10T13:21:40+5:30

दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुचित्रा बांदेकरांचा आज वाढदिवस आहे. 'वहिनीसाहेबां'च्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

aadesh bandekar shared emotional video on wife suchitra bandekar birthday | "नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ

"नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघेही प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुचित्रा बांदेकरांचा आज वाढदिवस आहे. वहिनीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

सुचित्रा बांदेकरांच्या वाढदिवसानिमित्त आदेश बांदेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांचे जुने फोटो आहेत. या व्हिडिओला त्यांनी "नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो", हे गाणं दिलं आहे. "सुचित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा", असं म्हणत त्यांनी सुचित्रा बांदेकरांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांची लव्हस्टोरीही फार फिल्मी आहे. सुचित्रा यांनी १८व्या वर्षी पळून जाऊन आदेश बांदेकरांबरोबर लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना सोहम हा मुलगा आहे. आईवडिलांप्रमाणेच सोहमही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 

Web Title: aadesh bandekar shared emotional video on wife suchitra bandekar birthday