'एक होती राजकन्या'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 20:07 IST2019-03-26T20:07:18+5:302019-03-26T20:07:39+5:30
सोनी मराठी वाहिनीवरील 'एक होती राजकन्या'मधील 'अवनी'ने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे

'एक होती राजकन्या'मध्ये आस्ताद काळेची एन्ट्री
सोनी मराठी वाहिनीवरील 'एक होती राजकन्या'मधील 'अवनी'ने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येच एका नवीन पात्राने मालिकेत एन्ट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे 'पुष्कराज'. अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसणार आहे.
'एक होती राजकन्या' मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहे. आतापर्यंत झालेल्या एपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे इ. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याशा जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे.
ती म्हणजे पुष्कराज. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेत येते.
पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहे. पण पुष्कराज नक्की कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्या अचानक येण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.
मालिकेचे पदर जसे उलगडत जातील तसा पुष्कराज प्रेक्षकांना कळू लागेल. अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.