"आई तू पण मोठी हो!" लेकाच्या वाढदिवसानिमित्त 'हास्यजत्रा' फेम नम्रताची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:24 AM2024-03-16T11:24:16+5:302024-03-16T11:24:50+5:30

नम्रता संभेरावचा लेक रुद्राजचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केलीय

A special post by 'Hasyajatra' fame Namrata sambherao on the occasion of son birthday | "आई तू पण मोठी हो!" लेकाच्या वाढदिवसानिमित्त 'हास्यजत्रा' फेम नम्रताची खास पोस्ट

"आई तू पण मोठी हो!" लेकाच्या वाढदिवसानिमित्त 'हास्यजत्रा' फेम नम्रताची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. नम्रताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' विविध अतरंगी व्यक्तिरेखा साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. नम्रता सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दल विविध अपडेट्स शेअर करत असते. अशातच नम्रताने एक नवीन पोस्ट केलीय. आज तिचा लेक रुद्राजचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नम्रताने लेकाला वाढदिवसाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

नम्रताने सोशल मीडियावर रुद्राजच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करुन लिहीलंय की, 

मी : वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा रुद्राज ♥️ खूप मोठा हो 
रुद्राज : आई तू पण मोठी हो 
मी : रुद्राज तू आता 5 वर्षांचा झालास म्हणजे खूप मोठा झालास
रुद्राज: पण मग आई मला शिडी का लागते चढायला?
मी : हो पण तुझा brain तर sharp होणार रुद्राज भारी नं !!
रुद्राज : पण आई पेन्सिल च्या टोकाएवढा sharp का ?


नम्रता पुढे लिहीते, "तुझ्या अशा अनेक प्रश्नांनी मी निरुत्तरित होते आणि मला अभिमान सुद्धा तितकाच वाटतो कारण माझं बाळ जगातलं सगळ्यात निरागस बाळ आहे .  माझं गोंडस लेकरू I LOVE YOU... आई तू माझी favorite आई असतेस हे वाक्य रोज कानावर पडतं.. मला special feel करून देण्याबद्दल खूप thanks रुद्राज" अनेकांनी या पोस्टखाली रुद्राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: A special post by 'Hasyajatra' fame Namrata sambherao on the occasion of son birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.