'इंद्रायणी' मालिकेत नवे वळण, गोपाळ देणार प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:25 IST2025-05-06T16:25:13+5:302025-05-06T16:25:56+5:30

Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिकेत इंद्रायणी मोहितरावांच्या आव्हानाला स्वीकारते.

A new twist in the series 'Indrayani', Gopal will confess his love | 'इंद्रायणी' मालिकेत नवे वळण, गोपाळ देणार प्रेमाची कबुली

'इंद्रायणी' मालिकेत नवे वळण, गोपाळ देणार प्रेमाची कबुली

कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत इंद्रायणी (Indrayani Serial) मोहितरावांच्या आव्हानाला स्वीकारते. "पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!" इंदू हे वचन कसं पूर्ण करणार? गोपाळ, अधू आणि संपूर्ण गावाची साथ तिला कशी मिळणार? इंदूचे हे वचन मालिकेला नवं वळण देणार आहे. असं असताना मालिकेत अजून एक ट्विस्ट येणार आहे ज्याची प्रेक्षक वाट पाहत होते गोपाळ इंदूवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण, दुसरीकडे अधूला देखील इंदू आवडते असं दिसून आले आहे. 

इंद्रायणी मालिकेत व्यंकू महाराज आणि इंद्रायणी आपल्या कीर्तनातून मोहितरावचा खरा चेहरा गावासमोर आणतात. यामुळेच मोहितराव चिडतो, तो इंदूवर आधीपासूनच वाईट नजर ठेवून आहे आणि आता तो स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवतो. मोहितराव इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो, तिथे गोपाळ येतो आणि इंदूला त्याच्या तावडीतून सोडवून, मोहितरावला बजावून सांगतो.माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. 


गोपाळच्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालिकेत काय घडणार? इंदू त्यावर काय उत्तर देणार? आणि कसं गोपाळ-इंदूचे प्रेम फुलणार? या सगळ्यात मोहीतराव आता काही शांत बसणार नाही. मोहितरावाचा आता इंदूला विरोध असल्याने तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. इंदू गावात शाळा उघडण्याचं आव्हान व्यंकू महाराज, गोपाळ - अधू आणि फँटया गँगच्या सहाय्याने कसे पूर्ण करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

Web Title: A new twist in the series 'Indrayani', Gopal will confess his love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.