'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट; होणार नव्या पात्राची एन्ट्री, मग घडणार असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:42 PM2022-06-27T12:42:26+5:302022-06-27T12:42:46+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे.

A new twist in the ‘Aai Kuthe Kay Karte’ series; There will be an entry of a new character, then something like this will happen ... | 'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट; होणार नव्या पात्राची एन्ट्री, मग घडणार असं काही...

'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट; होणार नव्या पात्राची एन्ट्री, मग घडणार असं काही...

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अरुंधतीचे म्युझिक आणि त्याच्या इन्स्टिट्युटचं काम जोरदार सुरू आहे. या कामासाठी ती बाहेर गेली आहे. अरुंधतीची होणारी प्रगती पाहून अनिरुद्धचा जळफळाट होताना दिसत आहे. दुसरीकडे अनघा प्रेग्नेंट आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र नुकतेच ईशाचे साहिल सोबत ब्रेकअप झाल्यामुळे ती थोडी डिस्ट्रब आहे. दरम्यान आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. 

आई कुठे काय करते मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. या पात्राचं नाव आहे नील. यश, गौरी आणि ईशा ज्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणार आहेत. तिथे नील त्यांना भेटणार आहे. नीलच्या एन्ट्रीनंतर मालिकेत नवीन ट्विस्ट निर्माण होणार आहे. 


नुकताच आई कुठे काय करतेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यात पाहायला मिळत आहे की, यश, गौरी आणि ईशा त्यांच्या फ्रेंड्ससोबत पिकनिकला आले आहेत. तिथे पोहचल्यानंतर त्यांना रिसिव्ह करण्यासाठी एक मुलगा असतो. ज्याचं नाव आहे नील. त्यावेळी तो पाहता क्षणीच ईशाच्या प्रेमात पडतो. ती सामान उचलत असताना तो थेट तिचा हातच पकडतो आणि त्यांची नजरानजर होते. नंतर तो तिची माफीदेखील मागतो. आता या पिकनिकमध्ये नील आणि ईशा यांच्यात काही नाते निर्माण होते का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: A new twist in the ‘Aai Kuthe Kay Karte’ series; There will be an entry of a new character, then something like this will happen ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.