'अबोली' मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय, मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली रणांगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:39 AM2024-04-22T11:39:04+5:302024-04-22T11:39:36+5:30

Aboli Serial : 'अबोली' या मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला जात आहे. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अबोली तिच्या बाजूने कोर्टात केस लढणार आहे.

A new chapter begins in the 'Aboli' series, Aboli in the battlefield to bring justice to Manwala | 'अबोली' मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय, मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली रणांगणात

'अबोली' मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय, मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी अबोली रणांगणात

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे अबोली (Aboli Serial). पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आलं आहे.  आता या मालिकेत सुरु होतोय नवा अध्याय. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला जात आहे. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अबोली तिच्या बाजूने कोर्टात केस लढणार आहे. 

अखेर मनवाला न्याय देण्यासाठी अबोलीने आव्हान स्वीकारलं आहे. प्रतापरावाच्या विरोधात आता अबोली मनवासाठी लढणार आहे. अबोलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी खूपच उत्सुक आहे. याचसाठी केला होता अट्टहास अशी भावना तिने व्यक्त केली. वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. माझ्या आजोबांचं स्वप्न होतं माझ्या आईने वकील व्हावं. आई वकील होऊ शकली नाही. मात्र मला जेव्हा वकिलाच्या रुपात आईने पाहिलं तेव्हा तिला गहिवरुन आलं. 

कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका जगता येतात. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. अबोलीच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे, असे गौरी कुलकर्णी म्हणाली. अबोलीचा न्यायासाठीचा हा लढा रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहा.

Web Title: A new chapter begins in the 'Aboli' series, Aboli in the battlefield to bring justice to Manwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.