'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:42 IST2024-07-04T12:41:28+5:302024-07-04T12:42:24+5:30

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

A big twist in the serial 'Tharla Tar Mag', this decision will be taken by Poorna Aaji regarding Sayali | 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार हा निर्णय

'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट, पूर्णा आजी सायलीबाबत घेणार हा निर्णय

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेनं अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टीआरपीच्या शर्यतीतदेखील पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पहातोय तो भावनिक क्षण ८ जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अखेर पूर्णा आजी सायलीला नात सून म्हणून स्वीकारणार आहे.

ठरलं तर मग मालिकेत अत्यंत महत्त्वाचं वळण येणार आहे. खरेतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचंच मन जिंकलं आहे. सायलीच्या निरागस स्वभावाच्या अर्जुनही प्रेमात पडला. पूर्णा आजीचं मत परिवर्तन व्हायला मात्र खूप वाट पहावी लागली. अनेक प्रसंगांमध्ये पूर्णा आजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा.

सायलीवर सोपावणार घरची जबाबदारी

तरीही पूर्णा आजीने सायलीला नात सूनेचा दर्जा कधीच दिला नाही. मात्र आता पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे आणि आता ती सायलीला तिची नात सून म्हणून स्वीकारणार आहे. संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्णा आजी घराची जबाबदारी सायलीवर सोपवणार आहे. मालिकेतला हा क्षण ८ जुलैच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: A big twist in the serial 'Tharla Tar Mag', this decision will be taken by Poorna Aaji regarding Sayali