ऋता दुर्गुळेच्या लग्नाला यायचं हं ! #18daystogo पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:30 IST2021-12-08T14:42:59+5:302021-12-08T15:30:29+5:30

मराठीतही सनई चौघडेचे सुर ऐकायला मिळणार आहेत. कारण ऋता दुर्गळेसुद्धा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहे.

18 Days to Go, Is Hruta Durgule's getting married On this Date, post caught attention of fans, check details | ऋता दुर्गुळेच्या लग्नाला यायचं हं ! #18daystogo पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष

ऋता दुर्गुळेच्या लग्नाला यायचं हं ! #18daystogo पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष

सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. मात्र सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या जरा जास्तच लगीनघाई आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत. हिंदी असो किंवा मराठी कलाकार सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. आता मराठीतही सनई चौघडेचे सुर ऐकायला मिळणार आहेत. कारण ऋता दुर्गळेसुद्धा (Hruta Durgule) लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहे. ऋताने काही दिवसांपूर्वीच फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. ऋताचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मात्र चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तर काहींचा हिरमोडही झाला असणार. तिच्या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटी मंडळींनीसुद्धा शुभेच्छा देत लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायाला मिळाले. 

त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ऋता आणि प्रतीक शहा या दोघांची चर्चा सुरु आहे. त्याच पाठोपाठ ऋताने #18daystogo म्हणत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ऋताने तिच्या लग्नाचा मुहूर्त ठरल्याचे संकेत तर नाही ना दिले ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पोस्टनुसार १८ दिवसांनी म्हणजेच येत्या २५ डिसेंबरला ऋता लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता नेमकं ऋताने लग्नाची तारिख सांगितली की, आणखी दुसरे काही प्रोजेक्टविषयी ती बोलते या विषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे १८ दिवस कशासाठी हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.

ऋताने अभिनयासोबत आपल्या लुक्सनेही चाहत्यांची पसंती मिळवली आहे. 'दुर्वा'मालिकेतून ती प्रकाशझोतात आली होती. 'फुलपाखरू'मालिकेतून ती घराघरात पोहचली. तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुकही झाले होते.आता  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala)मालिकेत ती झळकत आहे. मालिकेतल्या तिच्या भूमिकेनेसुद्धा अल्पावधीतच चाहत्यांची पसंती मिळवली आहे. 

दुसरीकडे प्रतीकविषयीही जाणून घेण्यातही चाहत्यांच्या मनात कुतुहूल निर्माण झाले आहे. प्रतीकसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.त्याने अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री मुग्धा शहा यांचा तो मुलगा आहे.

Web Title: 18 Days to Go, Is Hruta Durgule's getting married On this Date, post caught attention of fans, check details