'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 05:54 PM2024-05-25T17:54:02+5:302024-05-25T17:54:41+5:30

12 वर्षीय अथर्व बक्षीने 'अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

12 year old Atharva wins hearts in Superstar Singer 3 got nanha rafi title | 'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील, ‘सुपरस्टार सिंगर 3’ मधील छोटे स्पर्धक ‘रफी नाईट’ या खास एपिसोडमध्ये दिग्गज गायक मोहम्मद रफी यांना हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहतील. प्रसिद्ध गीतकार आणि कवी मनोज मुंतशिर, सुप्रसिद्ध अभिनेता रझा मुराद आणि प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार आणि विनीत सिंह हे या शो ची शोभा वाढवतील आणि रफी जी व त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांबद्दलचे काही रोचक किस्से सांगतील. 27 मे रोजी सुरू होत असलेल्या ‘पुकार दिल से दिल तक’ या आगामी नाट्यमय मालिकेत वेदिका ही व्यक्तिरेखा साकारणार्‍या सायली साळुंखे या अभिनेत्रीचे देखील रंगमंचावर स्वागत करण्यात येईल. ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.
 
कॅप्टन पवनदीप राजनच्या टीम मधील, हजारीबाग, झारखंडहून आलेल्या विलक्षण प्रतिभावान 12 वर्षीय अथर्व बक्षीने आपल्या ‘हम दोनो’ आणि ‘हसते जख्म’ या चित्रपटांतील, ‘अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
 
त्याच्या कामगिरीने प्रभावित झालेला मनोज मुंतशिर टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करत म्हणाला, “अथर्व गात असताना माझ्या मागे बसलेले लोक एकमेकांना सांगत होते की हा तर ‘नन्हा रफी’ आहे. त्यामुळे हा किताब मी त्यांच्याकडून उधार घेत आहे, तू खरोखरच छोटा रफी आहेस. तू जयदेव साहेब आणि मदन मोहन साहेब या दिग्गज संगीतकारांची गाणी सादर केलीस. या गाण्यांची निर्मिती तुझ्या जन्माच्या बर्‍याच आधी झाली होती, पण तू ती गाणी खुद्द जयदेव साहेब आणि मदन मोहन साहेब यांच्याबरोबर त्यांच्या म्युझिक स्टुडिओमध्ये बसून शिकला असावास असे वाटत होते. तू खूपच छान गायलास. तुला अनेक आशीर्वाद!”
 
त्याच्या परफॉर्मन्सने मंत्रमुग्ध झालेल्या सुपरजज नेहा कक्कडने त्याचे कौतुक करत म्हटले, “रफी साहेबांची ही दोन्ही गाणी इतकी विलक्षण आहेत आणि तू ती खूप मनापासून गायलास. अशा वैविध्यातूनच गायकाची ओळख होते. दोन पूर्णपणे वेगळ्या प्रकारची गाणी एका मंचावर सदर करणे म्हणजे कमाल आहे, यामधून तू किती विलक्षण आणि अष्टपैलू गायक आहेस हे कळते. अथर्व, आज मला तुला काहीतरी सांगायचे आहे, ‘बैठो ना दूर हमसे, देखो खफा ना हो, किस्मतसे मिल गए हो, मिलके जुदा न हो’”
 
कॅप्टन सलमान अलीने देखील पुष्टी जोडली, “हा जेव्हा गातो तेव्हा काहीतरी विलक्षण घडतेच, त्यामुळे मी त्याला ‘अथर्व जी’ म्हणेन. मी कायमच त्याच्याकडे आदराने आणि कौतुकाने बघतो. अनेक गायक उत्तम सादरीकरण करतात, पण एखाद्याबद्दल आपुलकी वाटणे आणि काहीतरी खास वाटणे दुर्मिळ आहे. अथर्वने आपल्या गायकीने तो आदर कमावला आहे. मी तुझी कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे, कारण जेव्हा तू परफॉर्म करतोस तेव्हा विलक्षण वातावरण निर्मिती होते. खूप छान, प्रभावशाली कामगिरी!”
 
त्याच्या मंत्रमुग्ध करणार्‍या कामगिरीनंतर, गायक शब्बीर कुमारने अथर्वला स्वतः तयार केलेले मोहम्मद रफी जींचे स्केच बक्षीस दिले. शो ची लज्जत वाढवण्यासाठी ‘पुकार दिल से दिल तक’ मधील  वेदिका उर्फ सायलीने अथर्व आणि देवांश्रीयाला आपल्या मालिकेतील आई आणि दोन मुलींमधील मार्मिक बंध जिवंत करणारे अंगाईगीत गाण्याची खास विनंती केली.
 
बघत रहा, ‘सुपरस्टार सिंगर 3’ दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Web Title: 12 year old Atharva wins hearts in Superstar Singer 3 got nanha rafi title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.