#10YearChallenge: लोकांनी म्हटले ‘प्लास्टिक की दुकान’; पूजा बॅनर्जीने दिले असे उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 11:18 IST2019-01-22T11:16:02+5:302019-01-22T11:18:42+5:30

सध्या सोशल मीडियावर ‘१० ईअर चॅलेंज’ची धूम आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपला १० वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हे चॅलेंज स्वीकारत आहेत. अर्थात यामुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोलर्सच्या टीकेला बळी पडत आहेत.

# 10YearChallenge: devon ke dev mahadev fame puja banerjee slams a troller | #10YearChallenge: लोकांनी म्हटले ‘प्लास्टिक की दुकान’; पूजा बॅनर्जीने दिले असे उत्तर!!

#10YearChallenge: लोकांनी म्हटले ‘प्लास्टिक की दुकान’; पूजा बॅनर्जीने दिले असे उत्तर!!

ठळक मुद्देयुजर्सच्या या प्रतिक्रिया पूजा सहन करू शकली नाही. मग काय, तिनेही युजर्सला खरमरीत उत्तर दिले.

सध्या सोशल मीडियावर ‘१० ईअर चॅलेंज’ची धूम आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपला १० वर्षांपूर्वीचा आणि आत्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हे चॅलेंज स्वीकारत आहेत. अर्थात यामुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोलर्सच्या टीकेला बळी पडत आहेत. शिवांगी जोशीपासून मलायका अरोरापर्यंत अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारत आपले फोटो शेअर केलेत. मग काय, ट्रोलर्सनी अनेकांना ट्रोल केले. आता या यादीत टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिचे नावही समाविष्ट झालेत.

होय, पूजानेही हे चॅलेंज स्वीकारत आपला १० वर्षांपूर्वीचा आणि सध्याचा असे दोन फोटो शेअर केलेत. पण हे फोटो पाहून अनेक युजर्सनी तिला ट्रोल केले. अनेक युजर्सनी पूजाला ‘प्लॅस्टिकची फॅक्ट्ररी’ म्हटले. तिने प्लास्टिक सर्जरी केली, असा आरोप केला.


युजर्सच्या या प्रतिक्रिया पूजा सहन करू शकली नाही. मग काय, तिनेही युजर्सला खरमरीत उत्तर दिले. ‘वा, कदाचित तुला माझ्यापेक्षा अधिक ठाऊक आहे. काहीही लिहिण्यापूर्वी विचार कर. जगात लोक केवळ प्लास्टिक सर्जरीने बदलत नाहीत. सर्जरीशिवायही अनेक पर्याय आहे. डायटिंग, योग, वर्कआऊट यानेही लोक बदलतात. माहित नसताना उगाच बरळू नकोस...’, असे पूजाने लिहिले.


‘तुझ संग प्रीत लगाई साजना’, देवों का देव महादेव, देव अशा अनेक मालिकेत पूजा बॅनर्जीने काम केले आहे. याशिवाश कॉमेडी नाईट्स विद कपिल, कॉमेडी नाईट्स बचाओ, झलक दिखला जा अशा रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. अनेक बंगाली चित्रपटांतही तिने काम केले आहे.

Web Title: # 10YearChallenge: devon ke dev mahadev fame puja banerjee slams a troller