अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:59 IST2025-07-16T10:58:51+5:302025-07-16T10:59:37+5:30

तेजश्रीने अशोक सराफ यांच्यासोबत कामही केलं आहे.

tejashree walawalkar chhoti rama from uncha maza zoka met ashok saraf shared post | अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट

अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट

झी मराठीवरील लोकप्रिय 'उंच माझा झोका' मालिकेत दिसलेली छोटी रमा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेच्या आठवणी ती अनेकदा शेअर करत असते. तसंच नऊवारी साडीमधला तिचा लूकही रिक्रिएट करत असते. तेजश्रीला इंडस्ट्रीत कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच नुकतीच तिची पद्मश्री अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf)  यांच्याशी भेट झाली. तेजश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत भावना मांडल्या आहेत.

तेजश्री वालावलकरने अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट केला. यासोबत ती लिहिते, "खूप महिन्यांनी अशोक मामांची भेट झाली...प्रत्येक वेळी खूप काही शिकवणारी, देणारी...आज अशोक मामांशी गप्पा मारुन वेगळाच आनंद मिळाला. त्यांनी भेट झाल्या झाल्या मारलेली हाक च खूप काही देणारी होती. आपण व्यक्ती म्हणून आपलं स्थान कसं जपावं आणि रचावं याबद्दल ते जे बोलले ते मनात घर करुन राहणार आहे. अशा दिग्गज व्यक्तींसोबत बोलायला, वेळ घालवायला आणि काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते."
 

तेजश्री वालावलकरने काही वर्षांपूर्वी अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं होतं. 'अस्मिता चित्र'च्या मालिकेत ती दिसली होती. तेजश्रीला अभिनयासोबतच लिहायलाही आवडतं. तिने दोन बालनाट्य लिहिली आहेत. 'हो, मला जमेल' आणि 'दहीहंडी' अशी ती दोन नाटकं आहेत. २०१० मध्ये आजी आणि नात चित्रपटात ती सुलभा देशपांडे यांच्यासोबत दिसली होती. तेजश्री बहुगुणी अभिनेत्री असून तिला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: tejashree walawalkar chhoti rama from uncha maza zoka met ashok saraf shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.